पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी नेहरूनगर न्यायालयातील न्यायाधीश आर. एस. वानखेडे, आर. एम. गिरी, पी. सी. फटाले, एस. पी. कुलकर्णी यांची बदली झाली आहे. त्यानिमित्त पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनच्या वतीने वकील बार रूम येथे निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
नेहरूनगर न्यायालयातील न्यायाधीश एन. आर. गजभिये, बी. डी. चौखंट, एम. जी. मोरे, ए. एम. बगे, एम. ए. आवळे, व्ही. एन. गायकवाड तसेच आजी, माजी अध्यक्ष आणि वकील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि कार्यकारणीद्वारे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. वकील बांधवांनी मनोगतांमधून न्यायाधीश यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी डिजीनोटीस ॲप्लिकेशनचे ॲप डेमो व प्रेझेंटेशन यशपाल बावीसकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, उपाध्यक्ष ॲड. प्रतीक्षा खिलारी, सचिव ॲड. धनंजय कोकणे, महिला सचिव ॲड. मोनिका सचवाणी, सहसचिव ॲड. उमेश खंदारे, खजिनदार ॲड. अजित खराडे, ऑडिटर ॲड. संदीप तापकीर, सदस्य ॲड. अस्मिता पिंगळे, ॲड. आयाज शेख, ॲड. फारूख शेख, ॲड. दशरथ बावकर, ॲड. स्वाती गायकवाड, ॲड. मीनल दर्शले यांनी केले. सचिव ॲड. धनंजय कोकणे यांनी सूत्रसंचालन केले. सदस्य ॲड. आयाज शेख यांनी आभार मानले.