वाकड (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी पिंपरी चिंचवडमधील वाकड परिसरात एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. वाकड येथील स्नेहा कलाटे यांच्याकडून मतदान करणाऱ्या मतदाराला एक झाड भेट म्हणून देण्यात आले. स्नेहा कलाटे यांनी राबविलेल्या या अनोख्या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघात आज निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून प्रशासनाकडून अनेक उपक्रम राबवण्यात आले. दरम्यान वाकड येथील सामाजिक कार्यकर्त्या स्नेहा कलाटे यांनी देखील एक अभिनव उपक्रम राबवला आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून सौ. कलाटे यांनी मतदान करणाऱ्या प्रत्येक मतदाराला एक झाड भेट म्हणून दिले आहे.
मतदानाचा टक्का वाढवण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्याचा प्रयत्न स्नेहा कलाटे यांनी केला आहे. त्यांनी राबवलेल्या या उपक्रमाला वाकड परिसरातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. स्नेहा कलाटे यांनी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.