पिंपरी (Pclive7.com):- गेली दोन महिने ४० अंश तापमान अन् उकाडा सहन करणाऱ्या पिंपरी चिंचवडकरांना रविवारी (दि.२६) गर्मीतून थोडासा दिलासा मिळाला आहे. आज शहराचे कमाल तापमान ३५.४ अंश इतके खाली आले होते. तर रात्री देखील २६.१ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली आहे.
एप्रिल आणि मे महिन्यातील भयंकर गर्मीने शहरवासीय त्रासले आहेत. अधून मधून येणारा पाऊस थोडावेळ थंडावा देत असला तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा तीव्र उकाडा जेरीस आणत आहे. संपूर्ण एप्रिल व आतापर्यंत मे महिना ३८ ते ४० अंश तापमान होते. दरम्यानच्या काळात तीन वेळा ४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे.
गेली दोन दिवस शहरात ढगाळ वातावरण होते. आज सकाळपासूनच हवेमध्ये काहीसा गारवा होता. त्यामुळे नागरिकांना रोजच्याप्रमाणे उन्हाच्या चटक्याचा सामना करावा लागला नाही. दिवसभर असेच वातावरण असल्याने बाहेर पडणाऱ्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता.

























Join Our Whatsapp Group