देहूरोड (Pclive7.com):- चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार केले. या घटनेत पत्नी गंभीर जखमी झाली आहे. ही घटना देहूरोड येथील शितळानगरमध्ये शुक्रवार (दि.२४) रोजी घडली. या प्रकरणी पती गिलानी समाझी कुरेशी (४६, रा. देहूरोड) याच्याविरोधात देहूरोड पोलिसांत फिर्याद देण्यात आली आहे.
फिर्यादी शाहिस्ता गिलानी कुरेशी (४६, शितळानगर, देहूरोड) यांचा पती गिलानी कुरेशी हा चारित्र्यावरून पत्नीवर संशय घेत होता. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. शुक्रवारी दुपारी दोघांमध्ये वाद झाला. त्या वेळी तुला खल्लास करून टाकतो, असे म्हणत आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात आणि हातावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीवर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.
Tags: देहूरोड पोलीस