पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुतळ्यास उद्योजक विजयराज पिसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दर रविवारची अखंडित साप्ताहिक पुजेचा ९ वा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या समाज बांधवाचा सत्कार करण्यात आला. त्यात ईश्वर ठोंबरे, मानसिंग खरात, विजय भोजने, गणेश एकल, कु. मयुरी थोरात, कु. आर्यंन जानकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी काका शेळके यांनी साप्ताहिक पुजेची माहिती दिली. दिपक भोजने यांनी प्रास्ताविक केले. ईश्वर ठोंबरे, विजय भोजने, महावीर काळे, विजयराज पिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी सुधाकर अर्जुन, पांडुरंग पिसे, सुनिल माने, चंद्रकांत जानकर, घोडके काका, राजाभाऊ धायगुडे, गणेश खरात, अशोक शेजाळ, दादासाहेब खरात, निलेश वाघमोडे, सुभाष हाके, शिवाजी अवारे, अच्युत लेंगरे, धनंजय गाडे, विभिषण घोडके, महेश खताळ, विठ्ठल देवकाते, विनोद बरकडे, सुमेध कावळे आदी समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमानंतर अल्पोपाहार ठेवण्यात आला होता. सूत्रसंचालन श्री गोरोबा (काका) शेळके यांनी केले. तर आभार कैलास दुर्गे यांनी मानले.