पिंपरी (Pclive7.com):- दुकानामध्ये दूध आणायला गेलेल्या १० वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डीमध्ये घडली आहे. हा प्रकार काल रात्री दहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करून, एकाला अटक करण्यात आली आहे.
बाबु उर्फ शामकुमार चन्द्रवली जयस्वाल (वय-१९) याला अटक करण्यात आली असून, पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी काल रात्री गिफ्ट आणि दुध आणण्यासाठी बिल्डींगच्या शेजारील दुकानात गेली होती. त्यावेळी आरोपीने मुलीचा विनयभंग केला. घडलेली घटना मुलीने आईला सांगितली. मुलीच्या आईने आज निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक निरीक्षक जी.बी. खारगे तपास करत आहेत.






















Join Our Whatsapp Group