पुणे (Pclive7.com):- छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा इतिहास हा प्रत्येक तरूणाला उर्जा देणारा आहे. आजच्या नवीन पिढीला शिवाजी महाराज नेमकं कसे होते हे कळणे फार गरजेचे आहे. महाराजांचे विचार घराघरात पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी शिवाजी महाराजांवरील ग्रंथाचे अद्यावत वाचनालय उभारण्याचा आम्ही निर्धार केला असल्याचे सामर्थ्य प्रबोधनीचे अध्यक्ष सुशांत भिसे म्हणाले.
पुणे शहरातील कर्वेनगर परिसरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीचे औचित्य साधून सामर्थ्य प्रबोधनीच्या वतीने परिसरातील राजे शिवराय प्रतिष्ठान, शिववंदना संघ, पतित पावन संघटना व शिवशंभो प्रतिष्ठान या मंडळांना भेटी देण्यात आल्या. भविष्यातही आपला हा उत्सव असाच भव्यदिव्यपणे साजरा होण्यासाठी या मंडळाना प्रेरणा मिळावी म्हणून “सुराज्याचे प्रति शिवाजी” ही पुस्तिका भेट देण्यात आल्या.
यावेळी संस्थेचे मंगेश साळेकर, अमन खेडेकर, जयराज भिसे, सुशिल भुमकर, अक्षय हनमघर, आशपाक सय्यद, विक्रांत जानराव आदी सदस्य उपस्थित होते.






















Join Our Whatsapp Group