पिंपरी (Pclive7.com):- अखिल पिंपरीगाव शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोणत्याही राजकीय पक्षाचा हस्तक्षेप न घेता सलोख्याने १२ दिवस शिवजन्म महोत्सव पिंपरीगावात साजरा करण्यात आला.
शिवजयंती निमित्त दररोज पिंपरीगाव येथील प्रत्येक मंडळात सायंकाळी शिवव्याखाने ठेवण्यात आली होती. संततुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रूग्णांनाअन्न फळवाटप करण्यात आले. तसेच रविवार दि.४ रोजी भव्यदिव्य मिरवणूक शगुन चौकापासून पिंपरीगावापर्यंत काढण्यात आली. या मिरवणूकीत विशेष करुण पंजाबी भांगडा नृत्य, राजस्थानी नृत्य, ढोल ताशा खेळ, महाराष्ट्रीयन ढोलपथक, लहान मुलाचे स्केटींग, मल्ल खांब यांचा समावेश होता. शिवरायाची गाणी वाजवत मोठ्या दिमाख्यात भगवे फडकवत डिजेच्या आवाजात ही मिरवणूक होती. या मिरवणूकीचे विशेष प्रमुख आकर्षण होते हैद्राबाद हिंदु टायगर आमदार राजासिंग ठाकुर, ते स्वता: शगुन चौकापासुन ते भैरवनाथ मंदिर शिवस्मारक पर्यत मिरवणुकीत सहभागी झाले होते. शेवटी शिवरायाच्या स्मारकाजवळ मिरवणुकीची सांगता हिंदु टायगर राजासिंग टायगर यांच्या हस्ते शिवरायाची आरती आणि तडफदार भाषणाने झाली. अखिल पिंपरीगाव शिवजयंती महोत्सव समितीतर्फे सर्व मतभेद विसरुन शिव-शंभु भक्त, गावकरी, महिला, जेष्ठ नागरिक, तरुण मुले, वर्गणीदार, माजी पदाधिकारी, सर्व पक्षीय नेते मंडळी, सर्व मंडळे, यांनी आवर्जुन सहभाग घेतला.























Join Our Whatsapp Group