पिंपरी (Pclive7.com):- नक्षलग्रस्त भागात रस्त्यांच्या विकासासंदर्भात केंद्र सरकारने कोणत्या उपाययोजना आखल्या आहेत आणि त्या योजनेंतर्गत आतापर्यंत किती रस्त्यांची कामे करण्यात आली यासंदर्भात खासदार अमर साबळे यांनी केंद्रीय रस्ते परिवहन मंत्रालयाचे लक्ष वेधलं.
देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील भाजपा खासदारांची त्यांच्या निवासस्थानी बैठक मागील अधिवेशनात घेतली होती. सदर बैठकीमध्ये नक्षलवाद या गंभीर समस्येकडे अभ्यासपूर्ण निवेदनासह खासदार अमर साबळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लक्ष वेधले होते. त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी नक्षलवाद हे देशापुढील गंभीर समस्या असून त्याबद्दल चिंता व्यक्त केली केली.
राज्यसभेच्या अधिवेशनात खासदार अमर साबळे यांनी या विषयावर केंद्र सरकारचे लक्ष वेधले. त्यांच्या या प्रश्नावर केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी माहिती दिली.
यावेळी मांडविया म्हणाले की, देशातील आंध्रप्रदेश, बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि उत्तर प्रदेश या राज्यांतील बहुतांश भाग हा नक्षली कारवायांनी ग्रस्त आहेत. या सर्व राज्यात मिळून २००९ मधील आरआरपी -१च्या अंतर्गत ५४८८ कि.मी. रस्त्यांच्या विकासासाठी ७३०० करोड रुपयांची योजना सुरू करण्यात आली आहे.
त्याअंतर्गत आंध्रप्रदेश राज्यातील १,१२६ कि.मी. रस्त्यांसाठी ३८ कोटी रुपये, बिहार राज्यातील ५४२ कि.मी. रस्त्यांसाठी १७ कोटी रुपये, छत्तीसगड राज्यातील १,७०४ कि.मी. रस्त्यांसाठी ३५२ कोटी, झारखंड राज्यातील रस्त्यांसाठी १,०२९ कि.मी.च्या रस्त्यासाठी १३३ कोटी, मध्य प्रदेश १८२ कि.मी. रस्त्यांसाठी ८ कोटी, महाराष्ट्रातील ७३९ कि.मी. रस्त्यांसाठी १०० कोटी रुपये, ओडिशा राज्यातील ८४९ कि.मी. रस्त्यांसाठी ३५ कोटी आणि उत्तर प्रदेश राज्यातील ३९ कि.मी. रस्त्यांसाठी १७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती मनसुख मांडविया यांनी खासदार साबळे यांना दिली.






















Join Our Whatsapp Group