पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपळे सौदागर मध्ये केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या तरुणाने मालकाच्या घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी आरोपीला पारस यादव (वय ३०, रा. पुणे) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथील डेफोलाईल्स सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मार्च २०२६ ते १९ जून २०२६ या कालावधीत त्यांच्या घरी केअरटेकर म्हणून काम करणाऱ्या पारस यादव याने घरातील सुमारे २ लाख २२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनंतर सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तपासादरम्यान आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली. आरोपीने फिर्यादी यांच्या संमतीशिवाय स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी चोरी केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सांगवी पोलीस करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group