
वसुंधरा संवर्धनासाठी इंटेलिजंट कॅडेट इंटरनॅशनल स्कूलचा पुढाकार; पिंपळ, वड, कडुलिंबसह विविध वृक्षांची विद्यार्थ्यांनी केली लागवड
पिंपरी (Pclive7.com):- हिंदूभूषण स्मारक ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड, पुणे यांच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इंटेलिजंट कॅडेट इंटरनॅशनल स्कूल, इंद्रायणी नगर, भोसरी यांच्या वतीने आयोजित या उपक्रमात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

हिंदूभूषण स्मारक ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेले हे स्मारक शहराच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अस्मितेचे प्रतीक मानले जाते. या स्मारकाच्या परिसरात वृक्षारोपण करून परिसर अधिक हरित आणि पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
स्मारकाच्या मागील बाजूस आयोजित कार्यक्रमात पिंपळ, वड, चिक्कू, पेरू, कडुलिंब आदी वृक्षांची लागवड करण्यात आली. “झाडे लावा, झाडे जगवा – पर्यावरण वाचवा!” हा संदेश देत विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमास हिंदूभूषण स्मारक ट्रस्टचे उपाध्यक्ष गणेश भुजबळ, ट्रस्ट सदस्य इंद्रजित भोसले, प्रसाद वायकर, समन्वयक गणेश गुरव, सहकारी ओमकार तसेच शाळेच्या प्राचार्या शिबी राजू आणि शिक्षकवर्ग उपस्थित होता.

“हिंदूभूषण स्मारक हे केवळ ऐतिहासिक अस्मितेचे प्रतीक नसून, सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकी जपणारे प्रेरणास्थान आहे. आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या या परिसरात वृक्षारोपण करून भावी पिढीसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक नागरिकाने किमान एक झाड लावून ते जगविण्याचा संकल्प केला, तर पर्यावरण संवर्धनाची मोठी चळवळ उभी राहू शकते.”
– गणेश भुजबळ, उपाध्यक्ष, हिंदूभूषण स्मारक ट्रस्ट.





















Join Our Whatsapp Group