पिंपरी (Pclive7.com):- माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त थेरगाव परिसरातील दहावी व बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ (दि.२२) आयोजित करण्यात आला आहे. नगरसेविका मायाताई बारणे व माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन केले आहे.

हा गुणगौरव समारंभ बुधवार, दि.२२ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला असून, संतोष मंगल कार्यालय, संतोषनगर, थेरगाव, पुणे येथे कार्यक्रम होणार आहे.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत २० जुलै २०२६ पर्यंत जय गणेश नागरी सहकारी पतसंस्था व जनसेवा नागरी सहकारी पतसंस्था, संतोषनगर, थेरगाव येथे जमा करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन जय गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक, सल्लागार, ठेवीदार प्रतिनिधी व कर्मचारी वर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे. आयोजकांनी परिसरातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेऊन सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.





















Join Our Whatsapp Group