भोसरी (Pclive7.com):- कीर्ती मारुती जाधव यांच्या पुढाकाराने भोसरी येथे आयोजित करण्यात आलेल्या मातंग समाजाचा कौटुंबिक स्नेह मेळाव्यास नागरिकांचा उत्स्फूर्त मिळाला.
आमदार महेश लांडगे, नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे, जेजुरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनिल सौंदडे, मातंग समाजाचे नेते भाऊसाहेब अडागळे, संदीपान झोंबाडे, पिंपरी चिंचवड अण्णाभाऊ साठे जयंती समितीचे अध्यक्ष नितीन घोलप, कमल घोलप, बापू वाघमारे, लहुजी शक्ती सेना शहराध्यक्ष लहू भाऊ अडसूळ, नाना कांबळे, सुनील भिसे, धनंजय भिसे, युवराज दाखले, मारुती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी विधान परिषद सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल आमदार गोरखे, जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सौंदडे, सुलतान लघुपटाच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांचे कार्य साता समुद्रापर पोचविणारे अविनाश कांबीकर, पायी परिक्रमा करणारे यशवंत कन्हेरे, अतुल काळोखे, सुमित कोंडे, अभिनेत्री धनश्री घोडे, आर्टिस्ट कल्पना वाघमारे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी आमदार लांडगे म्हणाले कि, आगामी काळात मातंग समाजाच्या बांधवाना योग्य ती संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. मला आपल्या समाजाप्रती आस्था आहेच त्यांना हक्काचे व्यासपीठ कसे याकडे अधिक लक्ष दिले जाईल. मातंग समाजाचे सौंदाडे यांना जेजुरी ट्रस्टचे अध्यक्ष केले आणि अमित गोरखे सारख्या तरुणाला आमदार केले. यांचा आपल्याला अभिमान वाटावा. आर्टिचे कार्यालय पुण्यात कसे येईल यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले.
आमदार गोरखे म्हणाले कि, मातंग समाज हा शहरात मोठया प्रमाणावर वास्तव्यास आहे. आमचा समाज अस्पृष्य, दुबळा, मानला जायचा. अस्पृष्य म्हणून मंदिरात प्रवेश नाकारला जायचा. आज आमच्या साठीच दरवाजे खुले केले आहे. याचा मला अभिमान आहे. आमचा समाज हा गरीब वा वंचित असला तरी विकाऊ नाही. आजातगायत राज्याकर्त्यांनी आमच्या समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला. मात्र येत्या काळात मातंग समाजाचे नगरसेवक महापालिकेत गेले पाहिजेत. अशी अपेक्षा व्यक्त केली.
आजतागयत आमच्या समाजाला केवळ झुलवत ठेवले आता सत्तेत वाटा मिळायला हवा. अशी मागणी कीर्ती जाधव यांनी यावेळी केली.
मातंग समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या तरुण-तरुणींचा, कलाकार व नागरिकांचा उचित असा सन्मान यावेळी करण्यात आला.
रिल्स स्टार शंभू महाजन,शंकर खवळे, माणिक पोळ, ज्योतीताई शिंदे, संतोष जाधव, दीपक मोतेवाड, अक्षय ओहोळ,धनंजय जाधव,अविनाश शिंदे, नाथा शिंदे, शंकर शिंदे,बाबू पाटोळे, राजू आवळे, , प्रेम जगताप, अक्षय पोळ, मयूर थोरात, सोमनाथ कांबळे,विठ्ठल चांदणे,राहुल गालफाडे, गोविंद खंडागळे, सचिन कसबे, नितीन घोलप, आकाश खवळे, दशरथ,अमोल अवसरमल, योगेश अवसरमल यांचा समावेश आहे.
यावेळी प्रसिद्ध गायक विशाल चव्हाण यांच्या गाण्याला रसिकांनी टाळ्या शिट्याची दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी तर आभार मारुती जाधव यांनी मानले.