पिंपरी (Pclive7.com):- रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीच्या ‘जलपर्णी मुक्त स्वच्छ व सुंदर पवनामाई उगम ते संगम’ या अभियानाला १२८ दिवस पूर्ण झाले. रविवार दि.११ रोजी केजुबाई बंधारा थेरगाव बोट क्लब येथे १२८ वा दिवस उत्साहात पार पडला. आजवर या अभियानात संपूर्ण महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभाग नोंदवला आहे. रविवारी झी मराठी सारेगमप घे पंगा कर दंगा विजेता अक्षय घाणेकर या अभियानात सहभागी झाला.
अक्षय हा शहरातील चिंचवडेनगरचा रहिवासी आहे. त्याने ‘नदी तीरावर नदीच्या पल्याड’ हे गाणे गाऊन अभियानात सहभागी होण्याचा आनंद व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र व गोवा बार काऊंसिलचे उमेदवार व पुणे जिल्हा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. गोरक्षनाथ काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच यावेळी पिंपरी चिंचवड ‘ग’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक निंबाळकर व सहाय्यक आरोग्य अधिकारी कुलकर्णी १० कर्मचा-यांसह सहभागी झाले. रानजाई प्रकल्पाचे आबा मुसुगडे व ४० लोकांच्या कामगार टिमसह, रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे रो. सुनील कवडे, रो. शेखर चिंचवडे, रो. राजेंद्र चिंचवडे, रो. गणेश बोरा, रो. जगन्नाथ फडतरे, रो. वसंत ढवळे, रो. सुभाष वाल्हेकर, रो. सचिन काळभोर,रो. मारुती ऊत्तेकर, रो. विरेंद्र केळकर, रो. युवराज वाल्हेकर, रो. संदीप वाल्हेकर, रो. स्वाती प्र वाल्हेकर, वैशाली खराडे, स्वाती पाटील, सिकंदर आणि संगीता घोडके, रविकांत व धनंजयव बालवडकर, एस. पी. वायर्स. टिम, पी.सी.सी.एफ, सावरकर मित्र मंडळ, भावसार व्हीजन, पोलीस नागरिक मित्र मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ महाराष्ट्र राज्य, सूर्यकांत मुथियान, गार्डन ग्रुप थेरगाव, एस के एफ व टेल्को कामगार ग्रूप, शेखर चिंचवडे युथ फाऊंडेशन, पिंपरी- चिंचवड बार असोसिएशनचे अॅड. हर्षद नढे, अॅड. महेश टेमगिरे, अॅड. जसवंत राठोड, राजस्थान अॅण्ड क्रुशिकेश पाटील मुंबई हायकोर्ट, आर्किटेक्ट योगेश सावंत, संजय कलाटे, अधीश व अक्षय घारपुरे, पार्थ व वैभव बेडेकर, अनेक महिलाबचत गट, अनेक निसर्गप्रेमी व संस्थांचे कार्यकर्ते श्रमदानासाठी सहभागी झाले.
अभियानाच्या सुरुवातीपासून यामध्ये सहभागी होण्याची इच्छा होती. मात्र, व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळत नसल्याने प्रत्यक्ष श्रमदान करण्याचे राहून गेले. रविवारी देखील वेळापत्रक भरलेले असताना वेळ काढून या अभियानात सहभागी झालो, अशा प्रकारच्या भावना अक्षयने यावेळी व्यक्त केल्या. मागील १२८ दिवसात जलपर्णीमुक्त पवनामाईसाठी केलेले वेगवेगळे उपाय, प्रयत्न, उगम ते संगम पवित्र पवनामाई संकल्पना याबाबतची माहिती रोटरीचे अध्यक्ष रो. प्रदीप वाल्हेकर आणि सोमनाथ आबा मुसुडगे यांनी नवीन सहभागी सदस्यांना सांगितली. भविष्यात केल्या जाणा-या तात्पुरत्या आणि कायमस्वरूपी कामाची व योजनांची माहिती दिली.
यावेळी ठेवलेल्या संचयन कलशामधे अनेकांनी अभियानास मदत करून आर्थिक हातभार लावला. नदीशी समरस झालेल्या सदस्यांनी आपले वाढदिवस व आनंदी क्षण नदी घाटावर साजरे करण्यास सुरुवात केली आहे. तन्मय संदीप वाल्हेकर (१४ वर्षे) व अधीश अक्षय घारपुरे (५ वर्षे) यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.
रविवारी (दि. 11) रोजी 10 ट्रक जलपर्णी नदीपात्राबाहेर काढण्यात आली. व ‘ग’ प्रभागा मार्फत 05 ट्रक लगेचच वाहून नेण्यात आली. अभियानामध्ये आजवर 750 ट्रक जलपर्णी पाण्याबाहेर काढण्यात आली आहे. दररोज चालणारे हे अभियान निसर्ग प्रेमींसाठी पुढील रविवारी (दि. 18 मार्च) केजुबाई बंधारा, थेरगाव येथे होणार आहे. प्रत्येकाने आपल्या दोन मित्रांसोबत या अभियानामध्ये सामिल व्हावे. तसेच आपण देत असलेल्या रविवारी दोन तासांच्या श्रमदानाप्रमाणे रोज पगारी 40 मजूर काम करतात. त्यांना मजुरीसाठी आपण रोख किंवा चेकच्या स्वरूपात आर्थिक मदत करून रोटरीचे हात बळकट करावेत, असे आवाहन रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप पोपटराव वाल्हेकर यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group