पिंपरी (Pclive7.com):- पूर्णानगर येथे दोन दिवसांपूर्वी वेदांत भोसले या दहावीत शिकणार्या विद्यार्थ्यांचा खून झाला होता. या प्रकरणी आरोपीला पोलीसांनी अटक केलीयं. मात्र पूर्णानगर परिसरात गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारी वाढत आहे. त्याच्या निषेधार्थ परिसरातील नागरिकांनी मुकमोर्चा काढत निषेध व्यक्त केलायं.
गेल्या दोन दिवसांपूर्वी दहावीत शिकणार्या वेदांत भोसले यांची हत्या झाली होती. या प्रकरणी पोलीसांनी एकास अटक केली आहे. वेदांतचे वडील जयवंत भोसले आणि आई जानव्ही भोसले यांनी या केसचे काम सरकारी वकील उज्वल निकम यांनी काम पहावे. तसेच आरोपीला कठोर अशी शिक्षा द्यावी अशी मागणी केलीय. यासंदर्भात आज संध्याकाळी पूर्णानगर परिसरातील नागरिकांनी मुकमोर्चा काढून निषेध व्यक्त केला. यावेळी नागरिकांनी या परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी केली.





















Join Our Whatsapp Group