पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि रोटरी क्लब ऑफ़ निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने “रनाथॉन ऑफ होप” या मॅरेथॉनचे आयोजन केले असल्याची माहिती अध्यक्ष सुहास ढमाले, रनाथॉन संचालक केशव मानगे यांनी दिली. या स्पर्धेची सुरुवात रविवारी दि.२९ सप्टेंबर रोजी सकाळी ५ वाजता निगडी भेळ चौक, येथील नियोजित महापौर निवास मैदान या ठिकाणी पासून प्रारंभ होणार आहे.

या स्पर्धेत सुमारे ५ हजार स्पर्धक सहभागी होत आहेत. स्पर्धकांना २१ किमी, १०किमी, ५ किमी आणि कॉर्पोरेट ५ किमी, फॅमिली गटात २ किमी अंतर गटात धावता येईल. तसेच महिला व ४५ वर्षे वरील वयोगटातील स्पर्धकांना स्वतंत्र बक्षिसे देण्यात येणार आहे. ऱनाथॉन स्पर्धेचे यंदा १३ वे वर्ष आहे अशी माहिती रनाथॉनचे संचालक मानगे यांनी दिली.

या स्पर्धेच्या माध्यमातून संकलित होणाऱ्या निधीतून रोटरी क्लब ऑफ़ निगडी तर्फे ग्रामीण भागात काही समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये आनंदी शाळा, आनंदी ग्राम, वैद्यकीय प्रकल्पाचा समावेश आहे. यासाठी हा निधी खर्च केला जाणार असल्याची माहिती निगडी क्लबचे अध्यक्ष श्री ढमाले यांनी दिली.
या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त सहभागी व्हावेत. सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी केशव मानगे – 9422522911, सुहास ढमाले – 9881461001 या क्रमांकावर संपर्क साधावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group