पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क येथे विज्ञान भारती (VIBHA) आणि इस्रो यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पेस ऑन व्हील्स’ हे अंतराळ प्रगतीचा आढावा घेणारी व इस्रो द्वारा अंतरीक्ष विज्ञानामध्ये केलेल्या विविध विकास टप्प्यांचे महत्त्व दर्शविणारे प्रदर्शन १९ व २० ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे.

या अंतरीक्ष प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी इस्रोचे ज्येष्ठ निवृत्त वैज्ञानिक व डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे सहकारी अरुणकुमार सिन्हा, पिंपरी चिंचवड सायन्स पार्कचे संस्थापक-संचालक प्रवीण तुपे, इस्रोचे तांत्रिक सहायक हरीश कुमार, विज्ञान भारतीचे क्षेत्रीय समन्वयक श्रीप्रसाद, पुणे विभागीय सचिव डॉ. मानसी माळगावकर, कार्यकर्ते अमोल देशपांडे, विठ्ठल रायगावकर, चांदोरकर, पराग क्षीरसागर, अक्षय केळकर, वीणा माळगावकर तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सुमारे ३००० विज्ञानप्रेमी प्रेक्षकांनी या अंतराळ प्रदर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे संयोजन व आयोजन पिंपरी चिंचवड सायन्स पार्कच्या वैज्ञानिक अधिकारी सोनल थोरवे, मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकुमार कासार, जनसंपर्क प्रभारी अस्मिता सावंत, सहायक शिक्षणाधिकारी सुनील पोटे यांनी केले.
कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:
– अंतराळ संशोधनाची ओळख: इस्रोच्या यशस्वी मोहिमांचे प्रतिकृती मॉडेल्स आणि संबंधित माहिती.
– शैक्षणिक उपक्रम: विद्यार्थ्यांना व्यावहारिक अनुभव देणारे क्रियाकलाप आणि स्पर्धा.
– सर्वांसाठी खुला प्रवेश: हा उपक्रम विद्यार्थ्यांसह शिक्षक, विज्ञान प्रेमी आणि नागरिकांसाठी खुला आहे.
– कार्यक्रमात सहभागी शाळा आणि संस्थांना प्रशस्तीपत्रे प्रदान केली जातील.
अधिक माहितीसाठी संपर्क:
डॉ. सुनील कुलकर्णी: ९७६४३ ६९३२७
श्री. किरण बडवे: ९९६०९ ३२७१९
श्री. अक्षय केळकर: ८४५९२ ८७९८३
श्री. सुनील चांदोरकर: ९४२२५ २३६३८
पिंपरी चिंचवड सायन्स पार्क: ७७४४९ ४४३३३
हा उपक्रम विज्ञान भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या समन्वयाने राबवला जात आहे.





















Join Our Whatsapp Group