वाकड (Pclive7.com):- राज्य शासनाने इंदिरा विद्यापीठाच्या स्थापनेला अधिकृत मंजुरी दिली असून ही नवीन शैक्षणिक संस्था २०२५ मध्ये कार्यान्वित होणार आहे. हे विद्यापीठ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उच्च शिक्षणावर मोठी छाप टाकण्यास सज्ज आहे. या विद्यापीठात शैक्षणिक उत्कृष्टता, औद्योगिक समर्पकता आणि सांस्कृतिक एकात्मता यावर भर दिला जाणार आहे. इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा आणि मुख्य मार्गदर्शिका डॉ. तरिता शंकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

इंदिरा विद्यापीठ फार्मसी, मॅनेजमेंट, लिबरल आर्टस, कॉमर्स अॅण्ड इकॉनॉमिक्स, कॉम्प्युटर सायन्स आणि पीएचडी यासह विविध अभ्यासक्रमांमुळे ते उच्च शिक्षणासाठी सर्वसमावेशक केंद्र बनेल. विद्यापीठाचे अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणच्या (एनईपी-२०२०) मार्गदर्शक तत्त्वांशी सुसंगत असेल. त्यामध्ये उदारमतवादी आणि कौशल्याधारित शिक्षणावर भर दिला जाईल. विद्यार्थ्यांना जागतिक करिअरसाठी आवश्यक अष्टपैलू कौशल्ये मिळतील.
इंदिरा विद्यापीठाची वैशिष्ट्ये…
औद्योगिक भागीदारी हे इंदिरा विद्यापीठाचे एक मुख्य वैशिष्ट्य ठरणार.
डिजिटल इनोव्हेशन, उद्योजकता, तंत्रज्ञानातील उदयोन्मुख क्षेत्रांतील करिअरसाठी उपयुक्त.
आघाडीच्या कंपन्यांशी घनिष्ठ संबंध-सहकार्य प्रस्थापित केले जाणार.
इंटर्नशिप, प्लेसमेंट आणि संशोधन प्रकल्पांच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा
आंतरराष्ट्रीय विद्यापीठांसोबत जागतिक सहकार्यावरही विद्यापीठाचा भर राहणार
भारतीय संस्कृती आणि भारतीय ज्ञान प्रणालींमध्ये विशेष अभ्यासक्रम
इंदिरा विद्यापीठ हे स्वतःला एक अग्रगण्य संस्था म्हणून जागतिक ८८ शैक्षणिक दर्जासाठी एक मजबूत पाया निर्माण करण्यास वचनबद्ध आहे.भारतातील कॉर्पोरेट, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात नेतृत्व विकसित करणे हा मुख्य उद्देश आहे. शिक्षण क्षेत्रात ३० वर्षांच्या वारशासह आम्ही नावीन्यपूर्ण शिक्षण मॉडेल ऑफर करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. जागतिक संस्थांसोबत भागीदारी स्थापित करणे आणि देशातील आमच्या संबंधांना अधिक बळकटी देण्याचे ध्येय आहे.– डॉ. तरिता शंकर, अध्यक्षा आणि मुख्य मार्गदर्शिका, इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट





















Join Our Whatsapp Group