तळेगाव (Pclive7.com):- तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिरगाव फाट्यावर एका महिलेचा मृतदेह पोत्यात आढळून आला. ही घटना सोमवारी (दि.२५) उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या पुणे मुंबई महामार्गावर शिरगाव फाट्यावर महिलेचा मृतदेह पोत्यात घालून फेकल्याची घटना उघडकीस आली. तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.
मयत महिलेची ओळख पटलेली नाही. तिचे वय अंदाजे ३० ते ४० आहे. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.






















Join Our Whatsapp Group