पिंपरी (Pclive7.com):- सामाजिक कार्यकर्त्या कीर्ती मारुती जाधव यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना निवेदन सादर करत हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांना पोलीस संरक्षण वाढवण्याची मागणी केली आहे.
शहरातील विविध भागांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचे रॅकेट सक्रिय असल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी २३ घुसखोरांना अटक करण्यात आली होती. हे रॅकेट बनावट ओळखीच्या आधारे पासपोर्ट तयार करून मोठ्या शहरांमध्ये काम करत असल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरातील समाज विघातक कृत्ये थांबवण्यासाठी तातडीने कोंबिंग ऑपरेशन हाती घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
चिखली-कुदळवाडी परिसरामध्ये अशा कृत्यांमुळे मोठा उद्रेक होण्याची शक्यता असल्याने, स्थानिक हिंदुत्ववादी नेत्यांना धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी आमदार महेश लांडगे यांना अधिक पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी विनंती कीर्ती जाधव यांनी केली आहे. पोलीस प्रशासनाने या मागणीची दखल घेऊन पुढील कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.






















Join Our Whatsapp Group