पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजप नगरसेविका अश्विनी बोबडे यांनी क्रीडा समितीच्या सदस्य पदाचा राजीनामा देत पक्षाला घरचा आहेर दिला.
आज झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. आजच्या सभेत सर्व विषय समितींच्या सदस्यपदाची निवड करण्यात आली. अश्विनी बोबडे यांची क्रीडा समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. मात्र ही निवड अमान्य असल्याचे सांगत बोबडे यांनी सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्या म्हणाल्या, मी पक्षाची जुनी कार्यकर्ती आहे. ९२ पासून मी पक्षाचे काम करत आहे. मी विधी समिती सदस्य पदाचा मागणी केली होती. मात्र मला डावलून क्रीडा समितीचे सदस्य पद देण्यात आले. बाहेरून पक्षात आलेल्यांना सर्व पदे दिली जातात.