पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशनचे उद्घाटन शुक्रवार दि.२७ एप्रिल रोजी सायंकाळी साडे सहा वाजता पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदा आमटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अशी माहिती संचालक विजय भिसे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
पिंपळे सौदागर येथील जर्वरी सोसायटी येथे हा कार्यक्रम होणार आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या या फाऊंडेशनच्या अध्यक्षा कुंदाताई संजय भिसे, कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्योजक शंकर जगताप, शुभांगी जगताप, नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका निर्मला कुटे, यशदा रिअल्टी ग्रुपचे चेअरमन वसंत काटे आदी प्रमुख पाहुणे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सचिन पवार (पर्यावरण), जगन्नाथ काटे (शैक्षणिक), ॲड. गीतांजली कडाते (वकील), शशिकांत काटे (क्रिडा), रोझलॅन्ड सोसायटी (सामाजिक) यांना डॉ. प्रकाश आमटे यांच्या हस्ते विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. अशी माहिती निमंत्रक राजू भिसे यांनी दिली आहे.






















Join Our Whatsapp Group