पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर भाजपात गेल्या वर्षभरापासून धुसफूस सुरू आहे. महापालिकेत सत्ता मिळूनही जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी त्यांना जाणीवपूर्वक डावलल्याने भाजपातील जुन्या – नव्यांचा वाद पुन्हा उफाळून आला आहे. पिंपरीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ आमरण उपोषण सुरू केले आहे.
आज सकाळपासून सुरू करण्यात आलेल्या या उपोषणात बाळासाहेब मोळक, संतोष तापकीर, शेखर लांडगे, अजय पाताडे, दत्ता तापकीर, पोपट हजारे, दिलीप गोसावी, सचिन काळभोर, माऊली गायकवाड, राजू वायसे, बाबा परब आदी कार्यकर्ते सहभागी झालेत.
केंद्रात, राज्यात भाजपाची सत्ता आली. एवढंच नव्हे तर पिंपरी महापालिकेवर इतिहासात पहिल्यांदाच भाजपाचा झेंडा फडकला. यात राष्ट्रवादीतील नेत्यांसह मोठ्यासंख्येने त्यांचे कार्यकर्ते भाजपात आले. सत्ता मिळाल्यानंतर बाहेरून आलेल्यांनाच भरभरून पदे देण्यात आली. महापालिकेतील प्रमुख पदांवरही त्यांनाच संधी देण्यात आली. वर्षानुवर्षे ज्यांना पक्षाचे निष्ठावंत म्हणून काम केले त्यांच्या पदरी मात्र निराशाच आली. प्रत्येक निवड प्रक्रियेत जुन्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आले. आज होत असलेल्या प्रभाग समितीच्या स्वीकृत सदस्यपदीही जुन्यांना कात्रजचा घाट दाखविण्यात आला. याचाच निषेध करत, पक्षश्रेष्ठींचे लक्षवेधण्यासाठी व न्याय मिळण्याच्या अपेक्षेने भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांनी पिंपरीत आमरण उपोषण सुरू केले आहे.
























Join Our Whatsapp Group