काँग्रेसचे उमेदवार आकाश शिंदे यांचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पत्र
पिंपरी (Pclive7.com):- प्रज्ञानबोधिनी शाळा, सोनवणे वस्ती येथील मुख्य मतदान केंद्राजवळ मतदारांना मतदानासाठी येताना वाहतूक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसचे उमेदवार आकाश शिंदे यांनी निवडणूक अधिकारी यांना पत्राद्वारे तक्रार केली असून, मतदानाच्या दिवशी मतदारांना सुरक्षित आणि मोफत प्रवासाची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.

शिंदे यांनी पत्रात नमूद केले आहे की, या मतदान केंद्रासाठी सुमारे ४३०० मतदारांची नोंदणी आहे. तथापि, परिसरातील मतदारांना शाळेत पोहोचण्यासाठी फक्त एकमेव रस्ता उपलब्ध आहे. या रस्त्यावरून जाणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी नगरसेविका (सध्या महिला उमेदवार) दरमहा २०० रुपये वसूल करत असल्याचेही पत्रात नमूद आहे. ही वसुली विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबीयांवर दबाव आणत असल्याचे आकाश शिंदे यांनी सांगितले आहे.
शिंदे यांनी निवडणूक अधिकारी यांना पत्राद्वारे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या सुचविलेल्या उपाययोजनांमध्ये: मतदान दिवशी रस्त्यावर कोणत्याही प्रकारची खाजगी वसुली/टोल रोखण्यासाठी पुरेसे पोलीस बंदोबस्त ठेवणे., मतदारांसाठी मोफत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणे., ४३०० मतदारांपैकी शक्य तितक्या जास्त लोकांना मतदानाचा हक्क बजावता येईल याची खात्री करणे.

सोनवणे यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारच्या अडचणींमुळे मतदान प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो आणि लोकशाही हक्कांचे उल्लंघन होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गंभीर दृष्टीकोनातून त्वरित लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी त्यांची विनंती आहे. स्थानिक नागरिकांनीही या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांचा असा दावा आहे की, मतदानाच्या दिवशी या अडचणी कायम राहिल्यास, अनेक मतदार मतदानासाठी येऊ शकणार नाहीत. प्रशासनाने लवकरात लवकर सुरक्षित वाहतूक आणि पोलीस बंदोबस्त करण्याचे सुनिश्चित केले पाहिजे.
“सोनवणे वस्तीतील प्रज्ञानबोधिनी शाळा हा भागातील मुख्य मतदान केंद्र आहे, आणि येथे सुमारे ४३०० मतदारांची नोंदणी आहे. परंतु, मतदारांना फक्त एकमेव रस्त्यावरून शाळेत पोहोचावे लागते, आणि या रस्त्यावरून विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर दरमहा वसुली केली जाते. मतदानाच्या दिवशी अशी अडचण कायम राहू नये. प्रशासनाने त्वरित पोलीस बंदोबस्त ठेवून मोफत आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था सुनिश्चित करावी, जेणेकरून प्रत्येक मतदार आपल्या हक्काचा उपयोग करू शकेल.”– आकाश शिंदे, उमेदवार, काँग्रेस.






















Join Our Whatsapp Group