पिंपरी (Pclive7.com):- निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली असून पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर, जिजामाता हॉस्पिटल, अशोक थिएटर प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजप–आरपीआय (आठवले) पॅनलने प्रचारात निर्णायक आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.

भाजपा आरपीआय युतीचे अधिकृत उमेदवार उषाताई वाघेरे, मोनिकाताई निकाळजे, गणेश ढाकणे आणि नरेश पंजाबी या उमेदवारांनी संपूर्ण प्रभाग पिंजून काढत ठिकठिकाणी बैठका, संवाद आणि प्रचार फेऱ्यांद्वारे मतदारांशी थेट संवाद साधला. प्रचारादरम्यान उमेदवारांनी सोसायटीधारक, व्यापारी, महिला व ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या बैठकींमध्ये कार्यकर्त्यांनी विजयाच्या जोरदार घोषणा देत उत्साह निर्माण केला. मतदारांचा वाढता प्रतिसाद आणि जनतेचा उत्साह पाहता आपल्या पॅनलचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाच्या व्हिजनला बळ देण्यासाठी भाजप पॅनलला बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. प्रचारादरम्यान सुखवणी कॅस्टल सोसायटी तसेच तपोवन मंदिर परिसरातील मतदारांसोबत बैठका पार पडल्या. यावेळी मतदान यंत्राद्वारे मतदान कसे करावे, याचे प्रात्यक्षिक दाखवून मतदारांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. चारही उमेदवारांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन देत आपला जाहीरनामा प्रसारित केला.
एकूणच प्रभाग २१ मध्ये भाजप–आरपीआय पॅनलला जनतेचा भक्कम पाठिंबा मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.






















Join Our Whatsapp Group