विकसित महाराष्ट्रासोबत विकसित पिंपरी-चिंचवड घडवण्याचा निर्धार व्यक्त करत मांडली प्रभाग क्रमांक २५ च्या विकासाची ७ सूत्र
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक २५ च्या सर्वांगीण विकासासाठी ठोस व्हिजन आणि कामाला प्राधान्य देणारे नेतृत्व आवश्यक असल्याचे मत भाजपचे उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केले. “मी बोलण्यापेक्षा कामाला प्राधान्य देतो, त्यामुळेच प्रभागाचा विकास शक्य झाला. येत्या काळात अजून विकासकामांना गती मिळेल.” असे स्पष्ट करत त्यांनी विकासकामांच्या माध्यमातून नागरिकांचा विश्वास मिळवला असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभाग क्रमांक २५ मधून भाजपचे संपूर्ण पॅनल निवडून देण्याचे आवाहन करताना त्यांनी सहकारी उमेदवार कुणाल वाव्हळकर, रेश्मा चेतन भुजबळ, श्रुती राम वाकडकर यांना मतदान रुपी आशीर्वाद देऊन, सेवेची संधी द्यावी असे आवाहन केले. महापालिका निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित पिंपरी चिंचवड शहर घडवण्याचा निर्धार व्यक्त करत भाजपच्यावतीने प्रचाराची सांगता करण्यात आली.

राज्यातील विकासाच्या दिशेबाबत बोलताना राहुल कलाटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व विकसित महाराष्ट्रासोबत विकसित पिंपरी-चिंचवड शहर घडवेल. सक्षम नेतृत्व, स्पष्ट धोरण आणि लोकाभिमुख निर्णय यामुळेच शहराचा विकास अधिक वेगाने साध्य होईल,” असे त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे प्रभाग २५ साठी पुढील काळातील व्हिजन स्पष्ट करताना राहुल कलाटे यांनी नागरिकांच्या मूलभूत गरजांवर केंद्रित अजेंडा मांडला. परिसराला टँकर मुक्त पाणी पुरवठा करणे, ट्रॅफिकमुक्त रस्ते, प्रदूषणमुक्त वातावरण, सक्षम आरोग्य सुविधा तसेच शिक्षण, क्रीडा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, नागरिकांची सुरक्षा हे या प्रभागाच्या विकासाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
“मी दिलेला शब्द पाळतो आणि जे बोलतो तेच करून दाखवतो. लोकांच्या विश्वासावरच माझी राजकीय आणि सामाजिक जीवनातील वाटचाल सुरु आहे. केवळ आश्वासने नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून बदल घडवणे हाच माझा अजेंडा आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक २५ मधील नागरिकांच्या समोर विकासाचे ७ सूत्र मांडत आहे.”
– राहुल कलाटे
प्रभाग २५ साठी विकासाची ७ सूत्र..
१. टँकरमुक्त प्रभाग – नियमित व पुरेसा पाणीपुरवठा
२. ट्रॅफिकमुक्त व्यवस्था – रस्ते, कनेक्टिव्हिटी, मेट्रो व पार्किंगचे नियोजन, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था
३. प्रदूषणमुक्त परिसर – हरित व धूळ, प्रदूषण नियंत्रण उपक्रम
४. आरोग्य सुविधा संपन्न प्रभाग – दवाखाने व वैद्यकीय सेवा, परवडणाऱ्या आरोग्य सुविधांमध्ये वाढ करणे
५. शिक्षण– क्रीडा – रोजगार सुविधा संपन्न प्रभाग – सर्व वयोगटातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी संधी
६. कुटुंब कल्याण आणि संस्कृती रक्षण – महिला सक्षमीकरण, ज्येष्ठ नागरिकांना सुलभता होईल असे उपक्रम आणि सांस्कृतिक पुनर्जागरण
७. सुरक्षित प्रभाग – प्रभागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध
“राहुल कलाटे यांच्या जनसंपर्काचा प्रचारादरम्यान भरपूर लाभ झाला. प्रभाग २५ मधील नागरिकांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास हीच आमची खरी ताकद आहे. विकास, पारदर्शकता आणि लोकांच्या प्रश्नांसाठी आम्ही एकजुटीने काम करणार आहोत. प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता विजयाचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे.”
– कुणाल वाव्हळकर
“प्रभागातील वाकड, ताथवडे, पुनावळे परिसरात राहणाऱ्या प्रत्येक महिलांचे प्रश्न, पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षितता या विषयांवर आम्ही ठोस भूमिका मांडली आहे. प्रचारादरम्यान मिळालेला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद हेच सांगतो की नागरिकांना विकास हवा आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रभागाचा सर्वसमावेशक विकास हाच आमचा खरा अजेंडा आहे.”
– रेश्मा चेतन भुजबळ
“प्रभाग क्रमांक २५ मधील महिलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येक घटकाच्या प्रश्नांना न्याय देणे ही आमच्या सर्वांची प्राथमिकता आहे. केवळ आश्वासनांवर नाही, तर प्रत्यक्ष कामातून विश्वास निर्माण करणे हेच भाजपाचे ध्येय आहे. राहुलदादा कलाटे यांचा अनुभव आणि प्रभागातील नागरिकांकडून मिळणारा पाठिंबा पाहता, प्रभागाचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी नागरिक आम्हाला नक्की आशीर्वाद देतील, याबाबत खात्री आहे.”
– श्रुती राम वाकडकर






















Join Our Whatsapp Group