पिंपरी (Pclive7.com):- दक्षिण भारत मित्र मंडळ यांच्या बॅनरखाली पिंपरी-चिंचवड शहरातील दक्षिण भारतीय नागरिकांची भव्य सभा आयोजित करण्यात आली. रविवारी सायंकाळी 7.30 वाजता प्राधिकरण येथील पर्ल बँक्वेट हॉल मध्ये झालेल्या या महासभेत हजारो दक्षिण भारतीय कुटुंबीयांनी सहभाग घेतला व भारतीय जनता पक्षाला भक्कम पाठिंबा जाहीर केला.

आगामी महानगरपालिका निवडणुकीत कर्नाटक, तमिळनाडू, केरळ व आंध्रप्रदेश येथून आलेले व पिंपरी-चिंचवड महानगरातील विविध प्रभागांमध्ये वास्तव्यास असलेले सर्व दक्षिण भारतीय नागरिकांनी भाजपला एकमुखी पाठिंबा द्यावा व कमळ चिन्हावर लढणाऱ्या सर्व भाजप उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन सभेत करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन करताना श्री. उण्णीकृष्णन यांनी देशाला “नॉर्थ-साऊथ” या नावाखाली विभागण्याचा प्रयत्न करणाऱ्या तसेच भारताची एकता व अखंडता धोक्यात आणणाऱ्या कटकारस्थानी शक्तींना ठामपणे विरोध करण्याची गरज व्यक्त केली. पिंपरी-चिंचवडचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या विकासकामांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पीसीएमसीमध्ये भाजपचीच महापालिका सत्ता आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र विधानपरिषद चे आमदार श्री. अमित गोरखे, प्रसिद्ध उद्योजक व राजकीय रणनीतीकार श्री. उमेशभाई चंदगुडे, तसेच उमेदवार अमित गौडा, राजू मिसाळ, शैलजा मोरे, कलभोर व प्रसाद शेट्टी यांनी उपस्थित राहून नागरिकांकडे मतदान व आशीर्वादाची मागणी केली.
युवा मोर्चाचे राज्य उपाध्यक्ष श्री. अनूप मोरे, नामवंत उद्योजक श्री. उल्लास शेट्टी, सीएमएस अध्यक्ष श्री. टी. पी. विजयन्, एनएसएस अध्यक्ष श्री. विश्वनाथन नायर, एमसीएस अध्यक्ष श्री. महेश, देहू रोड मलयाळी समाजाचे अध्यक्ष श्रीजी, कैरळी समाजाचे अध्यक्ष श्री. टी. पी. रवी यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजप जिल्हा सचिव श्री. अभिजीत बोरसे यांनी केले.






















Join Our Whatsapp Group