पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, प्रभाग क्रमांक १५ मधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्री. समीर जावळकर (अ गट) आणि श्री. चेतन गौतम बेंद्रे (ड गट) यांनी आज निगडी प्राधिकरण, सेक्टर २८ येथील ‘तक्षशिला बुद्ध विहारा’ला सदिच्छा भेट दिली.

यावेळी उमेदवारांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीस आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

या महत्त्वपूर्ण भेटीप्रसंगी तक्षशिला बुद्ध विहार समितीच्या अध्यक्षा श्रीमती निर्मला वालकर तसेच समितीचे मान्यवर सदस्य सर्वश्री गुणवंत रामटेके, मुनेश्वर मंगल, यशवंत भालेराव, बाळासाहेब सोनवणे, श्रीधर रोकडे आणि मधुकर गायकवाड उपस्थित होते.
उमेदवारांनी यावेळी समितीचे पदाधिकारी आणि उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला व त्यांचे आशीर्वाद घेतले. प्रभागाच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे मत यावेळी श्री. जावळकर आणि श्री. बेंद्रे यांनी व्यक्त केले.






















Join Our Whatsapp Group