पिंपरी (Pclive7.com):- मनी ट्रान्सफर करण्यासाठी निघालेल्या तरुणाला अडवून जबरदस्तीने कारमध्ये बसवले. त्यानंतर काही अंतरावर नेऊन मोबाईल आणि रोख रक्कम हिसकावून त्याला कारमधून उतरविल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी (दि. १५) रात्री साडेनऊच्या सुमारास जाधवनगर, चिखली येथील विशाल मोबाईल शॉपीजवळ घडली.

याबाबत राजनकुमार नंदकिशोर राजभर (२५, रा. चिखली, पुणे) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, गणेश पांडुरंग क्षीरसागर (२७, रा. चिखली, पुणे), सुहास ऊर्फ डेव्हिड आणि पप्पू चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजनकुमार पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी जात असताना तिघांनी त्यांना अडवून जबरदस्तीने कारमध्ये बसवले. काही अंतरावर नेल्यानंतर त्यांना कारमधून खाली उतरवून २० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि २० हजारांची रोकड असा एकूण ४० हजार रुपयांचा ऐवज हिसकावून आरोपी पसार झाले.






















Join Our Whatsapp Group