पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड महापालिका प्राथमिक शाळा, रावेत क्र. ९७ येथे स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाबाई जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील एलिमेंट्री चित्रकला परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

शाळेतील इयत्ता आठवीचा विद्यार्थी कृष्णा कडलग याने एलिमेंट्री चित्रकला परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत १६ वा क्रमांक पटकावला. तसेच भूमिती व अक्षरलेखन या विषयात ९५ गुण मिळवत राज्यात ६ वा क्रमांक मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल केले. या परीक्षेत शाळेचा १०० टक्के निकाल लागला असून २ विद्यार्थी अ श्रेणीत, ३ विद्यार्थी ब श्रेणीत तर उर्वरित विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले.

या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सायरा शिकलगार, माध्यमिक विभागाचे रामेश्वर पवार, चारूशीला जाधव, अर्चना ओहोळ, प्रियंका भनगडे, प्रज्ञा उके, इयत्ता आठवीच्या वर्गशिक्षिका जयश्री जाधव, शशिकांत चौधरी, सुखदेव वीर तसेच यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.






















Join Our Whatsapp Group