पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभेच्या १९ विभागीय पोस्ट कार्यालयात आधार केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचा लोकार्पण सोहळा चिंचवड येथील मुख्य पोस्ट कार्यालयात खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या प्रसंगी पुणे विभागाचे क्षेत्रीय पोस्ट कार्यालय अधिकारी अभिजीत बनसोडे तसेच पुणे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले, पोस्ट विभागाचे अधिकारी सामदास गायकवाड व के.आर.कोरडे उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या संचार मंत्रालयाच्या द्वारे क्षेत्रीय पोस्ट कार्यालयामध्ये नागरीकांच्या सोयीसाठी आधार केंद्र सुरू करण्याच्या सुचना मंत्रालयाच्या माध्यमातुन देण्यात आल्या आहे. त्याच अनुशंगाने मावळ लोकसभा मतदार संघातील १९ विभागीय पोस्ट ऑफीस कार्यालयात एकाच वेळी आधार केंद्राची सुरवात करण्यात आली. त्याचा लोकार्पण सोहळा मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या शुभ हस्ते चिंचवड येथील पोस्ट ऑफीस कार्यालयात करण्यात आला. यामध्ये चिंचवड स्टेशन चिंचवडगांव, आकुर्डी, औधकॅम्प, सि.एम.ई (दापोडी), दापोडी, कासारवाडी पिंपरी चिंचवड प्राधिकरण कार्यालय, पिंपळेगुरव, पिंपरी कॅम्प, पिंपरीगांव, देहु, देहुरोड कॅन्टोमेंट बोर्ड, तळेगाव, तळेगाव स्टेशन ,वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा, लोणावळा बाजार या ठिकाणी आधार केंद्राची सुरवात करण्यात आली. या प्रसंगी कार्यालयात उत्तम काम करणारे कर्मचारी तसेच पोस्टमनचा सन्मान खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, मावळ लोकसभेच्या अंतर्गत १९ ठिकाणी आधार केंद्र सुरू केल्याने नागरीकांची सोय या माध्यमातुन होणार आहे. आधार कार्ड हे सर्व शासकीय कागद पत्राचा एक भाग झाल्याने नागरीकांना आधार कार्ड काढण्याबरोबरच त्या मधील त्रुटी देखील दुर करण्यासाठी या सर्व केद्राचा उपयोग होईल. पोस्ट कार्यालयात यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात आला असुन नागरीकांना तत्काळ आधार कार्ड काढण्यासाठी याचा उपयोग होऊन वेळेची बचतही होईल. केंद्र सरकारच्या संचार मंत्रालयाच्या माध्यमातुन सुरू करण्यात आलेली ही आधार केंद्राची सेवा सर्व सामन्य माणसापर्यंत पोचवण्यात यावी असे खासदार श्रीरंग बारणे यांनी पोस्ट कर्मचाऱ्यांना केले. या प्रसंगी उत्क़ृष्ठ सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आलेल्या मध्ये पोस्टमनचा समावेश केल्याने खऱ्या व्यक्तीचा सन्मान होतो. याचा मला अभिमान वाटतो असे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले. पोस्टमन उन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता सायकलवर प्रवास करून नागरिकांची पोस्टाची पत्रे आजही वेळेवर घरी पोहचवतो. त्यांच्या कामाचा हा सन्मान आहे.
यावेळी पुणे क्षेत्रीय पोस्ट अधिकारी आभिजीत बनसोडे यांनी पोस्टाच्या कामकाजाविषयी माहिती दिली. त्याचबरोबर पोस्ट कार्यालये अधिक सक्षम करण्याचे आश्वासन दिले.
पुणे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले म्हणाले, पिंपरी चिंचवडला खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रयत्नातुन सुरू झालेले पासपोर्ट सेवा केंद्र देशातील सर्वाधिक पासपोर्ट देणारे केंद्र ठरले असून दररोज २७५ नागरिकांना पिंपरी येथील पासपोर्ट सेवा केंद्रातुन नवीन पासपोर्ट काढण्यासाठी व नूतनीकरण करण्यासाठी लाभ मिळत आहे. या सेवेचा फायदा अनेक नागरिकांना होत असून केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातून चांगली सोय उपलब्ध करण्यात आली आहे याचा जास्तीत जास्त लाभ नागरिकांनी घेण्याची सूचना त्यांनी केली.
आभार प्रदर्शन के. आर. कोरडे यांनी केले. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक कर्मचारी उपस्थीत होते.