पिंपरी (Pclive7.com):- वाढत्या पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड युवक राष्ट्रवादीने दुचाकीची अंतयात्रा काढली. युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वात काढण्यात आली. चिंचवड लिंकरोड येथून ही यात्रा चापेकर चौक मार्गे चिंचवडगाव पवना नदी घाटापर्यंत काढण्यात आली. यावेळी केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
या अंतयात्रेला शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, प्रवक्ते फजल शेख, नगरसेविका अपर्णा डोके, माजी नगरसेवक निलेश पांढरकर, राजेंद्र साळुंके, युवा नेते विजय गावडे, लाला चिंचवडे, विशाल काळभोर, संतोष वाघेरे, हर्षवर्धन भोईर, साकी गायकवाड, निलेश डोके, अलोक गायकवाड, रशिद सय्यद तसेच मोठ्या संख्येने महिला, युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी विरोधात आंदोलन करण्यात आले. पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ दुचाकीची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.