पिंपरी (Pclive7.com):- संकल्प लाडशाखीय वाणी समाज मंडळ मोशी व परिसरातर्फे महिलांसाठी हळदी-कुंकू व आर्थिक नियोजन परिसंवाद दिमाखात संपन्न झाला. वर्षांतला पहिला गोडवा घेवुन येणारा हा सण म्हणजेच महिलांचा हळदी-कुंकू समारंभ.. २५ जानेवारी रोजी मोशी येथील भव्य दिव्य अश्या सिझन बान्क्वेट हाँल येथे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.

सदर कार्यक्रमात महिलांमधील आपुलकी, सहकार्य आणि आनंद यांचा आविष्कार दिसून येत होता. या कार्यक्रमात महिलांनी परंपरागत वेश-भूषेसह नववारी साडी परिधान केलेली होती. हळदी कुंकू वाण म्हणून चांदीच्या कॉइनसह विविध वाण देण्यात आले.

दुस-या सत्रात, संकल्प मंडळाच्या टॅग लाईनला अनुसरून संकल्प एकजूट प्रगतीचा ,समाज विकासाचा आणि सर्वांगीण विकास झाला पाहिजे असे वाटत असेल तर आर्थिक बचत व भविष्यातील संधी योग्य वेळी समजुन घेतल्या पाहिजेत, त्याच जनजागृतीच्या उद्दिष्टाने मंडळातर्फे हळदी-कुंकू सोबत आर्थिक नियोजन परिसंवाद केला. मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केले होते अमृतकर सर्व्हिसेसचे संचालक चंद्रकांतजी अमृतकर ( AIFS ) तसेच नमितजी स्वानि – रिजनल हेड, UTI AMC, Pune यांचे उपस्थित समाजबांधवांना शेअर्स, इक्विटी, स्टाँक, म्युच्युअल फंड इत्यादीचे मार्गदर्शन मिळाले.

यावेळी उपस्थित समाजबांधवांनी स्वादिष्ट व रुचकर भोजनाचा आस्वाद घेत उत्साहाच्या वातावरणात हळदी- कुंकू व आर्थिक नियोजन परिसंवाद समारंभ अगदी थाटामाटात संपन्न झाला. सदर कार्यक्रमात मनोज ब्राम्हणकर, अमोल वाणी, श्रीकांत येवला, अभिजीत अमृतकर, शरद अमृतकर यांच्या कार्याचा आढावा देवून त्यांना गौरविण्यात आले.
नियोजित समारंभासाठी संकल्प लाडशाखीय वाणी समाज मंडळाचे अध्यक्ष किशोर ब्राम्हणकार व उपाध्यक्ष अतुल फुलदेवरे यांच्या मार्गदर्शनाने मोनाली फुलदेवरे व आश्विनी मुसळे यांनी सुत्रसंचलन केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संचालक स्वप्निल नानकर, स्वप्निल मुसळे, कुणाल पिंगळे, स्वप्निल कोतकर, आनंद येवले, विशाल पाखले, अमोल येवले, निलेश येवले भूषण वाणी यांनी परिश्रम घेतले. प्रणित दहिवेलकर यांनी उपस्थित समाज बांधवांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता केली.





















Join Our Whatsapp Group