पिंपरी (Pclive7.com):- आळंदी पोलिसांनी दारूबंदी अधिनियम अंतर्गत दाखल असलेल्या ७० गुन्ह्यातील ४ लाख ३१ हजार ९६३ रुपये किंमतीची दारू नष्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.

आळंदीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासकीय कामकाज प्रक्रिया सुलभकरण्यासाठी आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनात सुधारणा घडवून आणण्यासाठी पोलिस ठाणे स्तरावर सात कलमी योजना राबवली जात आहे. आळंदी पोलिसांनी दारूबंदी अधिनियम अंतर्गत दाखल असलेल्या ७० गुन्ह्यातील ४ लाख ३१ हजार ९६३ रुपये किमतीची देशी, विदेशी आणि गावठी दारू नष्ट केली आहे. यासाठी राजगुरूनगर न्यायालयाकडून परवानगी घेण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष ही दारू नष्ट करण्यात आली.






















Join Our Whatsapp Group