पिंपरी (Pclive7.com):- २५ जून १९७५ रोजी देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला ५१ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या आणि संविधानाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा काळा इतिहास समोर आणण्यासाठी पिंपरी येथे भाजप युवा मोर्चातर्फे ‘युवा संकल्प सभे’चे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ पार पडलेल्या या कार्यक्रमात भाजपच्या युवा कार्यकर्त्यांनी लोकशाही रक्षणाचा महासंकल्प केला. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आणीबाणीच्या काळातील जुलमी राजवटीचा भाजप पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि नागरिकांनी तीव्र निषेध केला.

संविधानाचा अपमान करणाऱ्यांचा बुरखा फाडणे आवश्यक – शत्रुघ्न काटे
युवा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शहराध्यक्ष श्री. शत्रुघ्न (बापू) काटे यांनी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. ते म्हणाले, “२५ जून १९७५ हा भारताच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस आहे. तत्कालीन काँग्रेस सरकारने स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी संपूर्ण देशात आणीबाणी लादली, लाखो देशभक्तांना तुरुंगात डांबले आणि प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले. ज्या काँग्रेसने लोकशाही संपवण्याचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान करण्याचे पाप केले, त्यांचा खरा चेहरा आजच्या युवा पिढीसमोर आणि सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे.”

लोकशाही रक्षणाचा निर्धार..
या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळात लोकशाही पुनरुज्जीवनासाठी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या व कडक तुरुंगवास सोसणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आणि देशभक्तांना मनोभावे नमन करण्यात आले. यावेळी युवा कार्यकर्त्यांनी एकमुखी संकल्प केला की, “भविष्यात जर कोणीही भारताची लोकशाही आणि संविधान संपवण्याचा किंवा त्याला धक्का लावण्याचा प्रयत्न केला, तर भाजपचा प्रत्येक युवा कार्यकर्ता रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करेल आणि लोकशाहीचे रक्षण करेल.”

या कार्यक्रमाला संघटन सरचिटणीस व कार्यक्रम संयोजक मोरेश्वर शेडगे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, नगरसेवक सुरेश भोईर, मंदार देशपांडे, सागर गवळी, अजय पाताडे, अजित कुलथे, दिनेश काटे पाटील, कैलास सानप, देवदत्त लांडे यांच्यासह भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि विविध आघाड्यांचे प्रमुख उपस्थित होते. तसेच सम्यक साबळे, राहुल खाडे, दिनेश काटे, सुमित घाटे, राजेश डोंगरे, कृष्णा कदम, प्रशांत अलमेल, प्रदीप महाजन, यश संभेराव, ऋषिकेश भालेकर, शरद भालेकर, आदित्य कुलकर्णी, दिपराज गुप्ता, रमेश वहीले, अमित देशमुख, आशिष राऊत, गोपाल मंडल, निखिल शहाणे, अभिजीत बागुल, प्रथमेश रुपनर, जगदीश येवले, स्वप्निल गाडे, रोहित कराळे, विजय दळवी, मयूर काळभोर, विवेक बारोट, सतीश नागरगोजे, प्रदीप नाईक, अजिंक्य गोळे, संग्राम खाडे, दयानंद बंडगर, प्रतीक भालेराव यांसह पिंपरी- चिंचवडमधील अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते आणि राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















Join Our Whatsapp Group