आळंदी (Pclive7.com):- निर्जला एकादशीच्या पावन पर्वानिमित्त आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर परिसरात आकर्षक आणि मनमोहक पुष्पसजावट करण्यात आली. विविध रंगांच्या ताज्या फुलांनी सजविण्यात आलेल्या मंदिरामुळे परिसराला भक्तिमय आणि आल्हाददायक स्वरूप प्राप्त झाले आहे.

एकादशी निमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच परराज्यांतून आलेल्या भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली. मंदिरातील समाधी परिसर, मुख्य सभामंडप आणि प्रवेशद्वार फुलांच्या देखण्या सजावटीने नटले होते. या आकर्षक सजावटीमुळे भाविकांचे विशेष लक्ष वेधले गेले.

यावेळी भाविकांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेत भक्तिभावाने पूजा-अर्चा केली. निर्जला एकादशीच्या निमित्ताने मंदिर परिसरात दिवसभर धार्मिक वातावरण असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.




















Join Our Whatsapp Group