पिंपरी (Pclive7.com):- पिंपळे सौदागर येथे निर्मलाताई कुटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करनण्यात आलेल्या ‘आंबा महोत्सवाचे’ उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे, नगरसेविका सुनिताताई तापकीर, जयनाथ काटे, बबनराव झिंजुर्डे, शेखर कुटे, स्वीकृत नगरसदस्य संदीप नखाते, अरुण चाबुकस्वार, अनिल नखाते, भानुदास काटे, वाल्मिक कुटे, चंदाताई भिसे, संजय भिसे, सुप्रिया पाटील, संजय कुटे, जेष्ठ नागरिक व समस्त ग्रामस्त उपस्थित होते.
पिंपळे सौदागर मधील निर्मलाताई कुटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने ३० जून पर्यंत आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येथील रोज लँड सोसायटी शेजारील महापालिकेच्या नियोजित मैदानात हा महोत्सव भरविण्यात आला आहे.
उद्घाटनानंतर आमदार लक्ष्मण जगताप यांनी सर्व आंबा विक्री स्टॉलवर जाऊन शेतकर्यांशी चर्चा केली. यावेळी बोलताना आमदार जगताप म्हणाले, कोकणातील कष्टकरी शेतकर्यांनी पिकवलेल्या आंब्याला या महोत्सवामुळे चांगला बाजारभाव मिळणार आहे. तसेच शेतकर्यांचा आंबा थेट ग्राहकांना दिल्याने परिसरातील नागरिकांना नक्कीच स्वस्त आणि चांगल्या दर्जाचा आंबा मिळणार आहे. निर्मला कुटे यांनी आयोजित केलेल्या या आंबा महोत्सवामुळे शेतकरी तसेच नागरिकांच्या फायद्याचाच ठरणार असून जास्तीस जास्त नागरिकांनी येथे भेट देऊन आंबा खरेदी करावे असे आवाहन केले.





















Join Our Whatsapp Group