पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपाचे नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपाशी ‘काडीमोड’ केला. त्यापाठोपाठ चंद्रकांता सोनकांबळे यांनी ओव्हाळांचा आरपीआयशी काहीच संबंध नसल्याचे सांगत नगरसेवकपदाचा राजीनामा मागितला. आता या प्रकरणात मनसेने उडी घेतली आहे. बाळासाहेब ओव्हाळ यांच्यावर जर अन्याय होत असेल तर त्यांनी मनसेत यावे, त्यांचे स्वागतच करू अशी प्रतिक्रिया पिंपरी चिंचवड मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी Pclive7.com शी बोलताना व्यक्त केली.
नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळांना मनसेची ‘ऑफर’
