
पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी फाटा परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई १८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास गोकुळ स्वीट्सजवळ, इलेक्ट्रिक टॉवरच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली. यावेळी आरोपींकडून ९,८०० रुपये रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

या प्रकरणी पोलीस हवालदार तुषार अशोक शेटे यांनी फिर्याद दिली असून पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार ॲक्ट कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये किशन जसवंत निरवणे (वय ५१), काजी रोते श्रेष्ठ (वय ३९), मेघराज देकराज आर्यन (वय ४३), गणेश डंबर शर्मा (वय ४६) आणि महादेव दिगंबर सानप (वय ४४) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी जुगार खेळत होते. पुढील तपास सुरू असून अशा बेकायदेशीर प्रकारांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.




















Join Our Whatsapp Group