
पिंपरी (Pclive7.com):- श्रीलंकेतील कोलंबो येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आयकॉम अबॅकस स्पर्धेत पिरॅमिड अकॅडमी, भोसरी येथील विद्यार्थिनी इशिता मेघना महेश बाफना हिने उत्कृष्ट यश संपादन करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे नाव उज्ज्वल झाले आहे.

या स्पर्धेत इशिताने अवघ्या सहा मिनिटांत तब्बल १५८ प्रॉब्लेम्स अचूक सोडवत आपली बुद्धिमत्ता आणि वेग सिद्ध केला. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोलंबो येथे तिला ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

इशिताच्या यशामागे तिच्या अथक परिश्रमाबरोबरच अबॅकस शिक्षिका सौ. मेघना बाफना यांचे मार्गदर्शन तसेच अरिस्टो किड्सचे संचालक उज्ज्वल पांडा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. इशिताच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, ती इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.




















Join Our Whatsapp Group