पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या एका २३ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पूजा अंकुश वाघमारे असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी रात्री दहाच्या सुमारास मारुंजी येथे घडला.
पूजा ही आयटी कंपनीत काम करत होती. तिच्या दोन मैत्रीणींसोबत मारूंजी येथे ती रहात होती. तिची एक मैत्रीण सुट्टी काढून गावाला गेली होती. तर दुसरी दुपारी कामाला गेली होती. रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास ती कामावरून परत आल्यानंतर दार कोणीच उघडत नव्हते. अखेरीस दरवाजा तोडून उघडला असता. पूजाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. त्यानंतर हिंजवडी पोलीस घटना स्थळी दाखल झाले होते. दरम्यान पूजाने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.





















Join Our Whatsapp Group