पिंपरी (Pclive7.com):- प्रभाग क्र.३२ अंतर्गत सांगवी, नवी सांगवी परिसरातील नाल्यांच्या साफसफाई कामकाजाला वेग आला असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाई पूर्ण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य खात्याने कंबर कसली असल्याचे चित्र सांगवी परिसरात दिसून येत आहे. नगरसेवक हर्षल ढोरे यांनी स्वत: या लक्ष देऊन या कामाचा आढावा घेतला.
आरोग्य विभागाकडुन जुनी सांगवीतील कै. शकुंतलाबाई शितोळे शाळेशेजारील व शिवांजली परिसरातील नाले साफ – सफाई पूर्ण करण्यात आली. नवी सांगवी दशक्रिया घाट, इंद्रप्रस्थ सोसायटी समोरील नाला साफसफाईचे कामकाज प्रगतीपथावर सुरू आहे. आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य खात्याचे पंधरा ते वीस कर्मचारी गेली पंधरा दिवस नालेसफाईच्या कामात व्यस्त आहेत.
शिवांजली परिसर व दशक्रिया घाट येथील नालेसफाईच्या कामाची नगरसेवक हर्षल ढोरे यांनी पाहणी केली. “एम एस काटे चौक, नर्मदा गार्डेन येथील नाला साफसफाईच्या कामासाठी आरोग्य विभागाच्या मदतीला स्थापत्य विभागामार्फत जेसीबी व अन्य साधनसामुग्री उपलब्ध करून दिली जाईल. येत्या आठ-दहा दिवसांत सांगवी-नवी सांगवीतील नालेसफाईची कामे मार्गी लावली जातील,” असे नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सांगितले.
सांगवीत नाले सफाईच्या कामांना वेग





















Join Our Whatsapp Group