पिंपरी (Pclive7.com):- पिंपरीतील एच.ए. कॉलनीत दुपारी १ वाजण्याच्या सुमारास एका महिलेवर गोळीबार झालाय. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हा गोळीबार केला. सुदैवाने यामध्ये महिलेला गोळी लागली नसली तरी भर दिवसा घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडालीय. शितल सिकंदर (वय ३५, रा. गांधीनगर, पिंपरी) असे गोळीबार झालेल्या महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शितल सिकंदर या दुपारी एकच्या सुमारास एच.ए. कॉलनीतील शाळेसमोरून जात होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्यावर गोळी झाडली. सुदैवाने त्यांना गोळी लागली नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या हल्ल्यामागचे कारण अद्याप समजू शकले नाही. पिंपरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.






















Join Our Whatsapp Group