पिंपरी (Pclive7.com):- गंभीर गुन्हे दाखल असलेल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड महापालिकेतील भाजपचे दोन नगरसेवक सध्या फरार आहेत. क्रीडा समिती सभापती संजय नेवाळे आणि सदस्य सुजाता पालांडे यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. मात्र आज महापालिकेत होणाऱ्या क्रीडा समितीच्या बैठकीला हे दोघेही उपस्थित राहणार की नाहीत, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र आजची सभाच चक्क रद्द करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजपावर ओढावली आहे.
चिखलीतील एका दुकानदाराला मारहाणप्रकरणी अडचणीत सापडलेले क्रीडा समिती सभापती संजय नेवाळे फरार आहेत. तर संत तुकारामनगरमधील एका टपरीधारकाच्या आत्महत्येला जबाबदार असल्याप्रकरणी नगरसेविका सुजाता पालांडे यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या गंभीर गुन्ह्या प्रकरणी दोघेही अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दरम्यान, आज शुक्रवारी क्रीडा समितीची पाक्षिक बैठक महापालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात दुपारी ३ वाजता होती. यापूर्वी देखील फरारी असलेले अनेक नगरसेवक महापालिका सभेला हजेरी लावत असल्याचे दिसून आले आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजच्या क्रीडा समिती बैठकीला नेवाळेंसह पालांडे उपस्थित राहणार की नाही? याबाबत जोरदार चर्चा रंगू लागली होती. मात्र नेवाळेंसह पालांडे देखील या बैठकीला गैरहजर राहिले असून क्रीडा समितीची सभा कोणतेही कारण न देता गुंडाळण्यात आली.






















Join Our Whatsapp Group