हिंजवडी (Pclive7.com):- आयटी पार्क हिंजवडीत आज एनएसजी कमांडोकडून मॉक ड्रिल पार पडत आहे. यासाठी एनएसजीचं हेलिकॉप्टर देखील याठिकाणी आलं आहे.

आयटी कंपनीत अतिरेकी हल्ला झाला तर काय खबरदारी घ्यावी? आणि रेस्क्यू ऑपरेशन कसं पार पाडता येईल. या अनुषंगाने सर्व प्रात्यक्षिक पार पडत आहेत. याठिकाणी कंपनीच्या बाहेर स्थानिक पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. कंपनीच्या आवारात केवळ एनएसजी कमांडो आहेत. बाहेरच्या कोणाला ही आत प्रवेश दिला जात नाही.

दरम्यान मॉक ड्रीलच्या या प्रकारामुळे हिंजवडी परिसरात काही काळ घबराटीचे वातावरण पसरले होते. या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तसेच एनएसजीचे कमांडो आल्यामुळे नेमकं काय घडलं याची जोरदार चर्चा रंगू लागली होती. दरम्यान मॉक ड्रिल असल्याचे समोर आल्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.























Join Our Whatsapp Group