पिंपरी (Pclive7.com):- जागतिक पितृदिनानिमित्त पिंपळे सौदागर येथील उद्योजक संदीप काटे, निलेश काटे आणि संतोष काटे यांनी आपले वडील विठ्ठल सीताराम काटे व आई हिराबाई काटे यांना अनोखी भेट दिली. कोणीही मोठी तसेच राजकीय व्यक्ती न बोलवता आपल्या आई-वडीलांच्याच हस्ते शाळेचे उद्घाटन केले.
पिंपळे सौदागर येथे काटे बंधूंची चॅलेंजर पब्लिक स्कूल ही शाळा आहे. गेल्या कित्तेत वर्षापासून या शाळेने परिसरात चांगला नावलौकिक मिळवला आहे. या शाळेची वाकड येथे दुसरी शाखा सुरू करण्यात आली. वाकडच्या या चॅलेंजर पब्लिक स्कूलचे उद्घाटन काटे बंधूंनी त्यांचे आई-वडील विठ्ठल आणि हिराबाई काटे यांच्या हस्ते केले. आई, वडील व ज्ञान हे जगात सर्वश्रेष्ठ असल्याचे काटे बंधूंनी दाखवून दिले आहे. या शाळेच्या उद्घाटनाच्या वेळेस ज्या विद्यार्थांनी शाळेत अॅडमिशन घेतले, त्यांना एक झाडाचे रोप देऊन शाळेच्या मैदानात वृक्षारोपण करावयास लावले. यावेळी संदीप व निलेश काटे म्हणाले, आई वडिलांचे आशीर्वाद असतील तर शिक्षण व व्यवसाय क्षेत्रात व्यक्ती खूप प्रगती करु शकतो. यावेळी संतोष काटे व चॅलेंजर्स स्कूलचे सर्व शिक्षक आदी उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group