पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दर आठवड्याला होणार्या स्थायी बैठकीत आयुक्तांसह सर्वच अधिकार्यांना तब्बल दीड तास ताटकळत बसावे लागले. आज दुपारी २ वाजता सुरू होणारी स्थायीची बैठक साडे तीन वाजता सुरू झाली. दरम्यान स्थायीचा एक ‘सुभेदार’ सदस्य तळमजल्यावर तळ ठोकून बसला होता. तर स्थायीचे इतर सदस्य तिसर्या मजल्यावर घुटमळत असल्याचे चित्र होते. स्थायीत ऐनवेळचे ‘अर्थ’पूर्ण विषय आणण्याच्या घाईमुळे या बैठकीला उशीर झाल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली…