छटपूजा निमित्त विश्व श्रीराम सेनेने केला मोशी इंद्रायणी घाट स्वच्छ
पिंपरी (Pclive7.com):- सूर्य देवतेची उपासना करणारे छट पूजा व्रत उत्तर भारतात आणि विशेषतः बिहार मध्ये मोठ्या भक्ती भावाने साजरे केले जाते. मागील अनेक वर्षांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात देखील छटपूजा श्री सूर्यषष्ठी महाव्रत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गतवर्षी प्रमाणे श्री विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथील इंद्रायणी नदीच्या घाटावर छटपूजा सोमवारी, (दि.२७) सायंकाळी, ६:०४ वाजता, सूर्यास्त वेळी हजारो भाविकांच्या साक्षीने वाराणसी येथून आलेल्या प्रतिनिधींच्या हस्ते भव्य गंगा आरती करून साजरा करण्यात येणार आहे. समारोप मंगळवारी (दि.२८) सकाळी ६:३३ वाजता, सूर्योदय वेळी सूर्याला अर्ध्य देऊन होईल. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विश्व श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष लालबाबू अंबिकालाल गुप्ता यांनी केले आहे.

यानिमित्त श्री विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथील इंद्रायणी नदी घाटावर शुक्रवारी, शनिवारी स्वच्छता अभियान राबविण्यात आले. सध्या इंद्रायणी नदीत कचरा व गाळ साचून पाणी व परिसर अस्वच्छ झाला आहे. नदीत टाकण्यात आलेले निर्माल्य, घट, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, काचा, फाटके कपडे, थर्माकोल, लाकडी मंदिरे, प्लेट, ग्लास, नारळ, फळे आदी कचरा व गाळ काढून नदी घाट परिसर झाडून स्वच्छ करण्यात आला.

या नदीघाटा वर भोसरी, मोशी, पिंपरी नेहरू नगर, चिंचवड़, चिंबळी, कुरुळी, कोयाळी, चाकण, मोशी, जाधववाडी, चिखली, निघोजे, आकुर्डी, तळवडे, आळंदी कृष्णानगर आदी भागातून भक्त भाविक पूजे साठी उपस्थित राहणार आहेत. यावेळी पारंपरिक पूजा करून भजन, छट लोकगीते सादर करण्यात येतील व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती लालबाबू गुप्ता यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
























Join Our Whatsapp Group