
पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकने आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्या बाबत महाविकास आघाडी आक्रमक झाली असून त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रवेश द्वारावर प्रतिकात्मक मतदार याद्या जाळून महिपालिकेच्या निवडणूक विभागाचा निषेध व्यक्त केला आहे.

यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, नेत्या सुलक्षणा शीलवंत धर, काँग्रेसच्या नेत्या मनीषा गरुड यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिका प्रवेशद्वारासमोर महाविकास आघाडीचे वतीने हे आंदोलन करण्यात आले. मतदार याद्या जाळून पालिका प्रशासन तसेच निवडणूक विभागाचा निषेध व्यक्त करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यावरूनच निवडणूक आयोग या याद्या बनवत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावेळी केला आहे.

दरम्यान अशा याद्या घेऊन आम्ही निवडणुकीला का सामोरे जाऊ असं म्हणत आम्ही या प्रतिकात्मक याद्या जाळल्या आहेत.निवडणूक विभागाने या याद्यामधील असलेल्या त्रुटी आधी दूर कराव्यात मगच निवडणुका कराव्यात अशी मागणी ही महाविकास आघाडीने केली आहे.

























Join Our Whatsapp Group