मोफत तपासण्या, आठ हजारांहून अधिक किमतीच्या आरोग्या तपासण्या पूर्णतः मोफत
पिंपरी (Pclive7.com):- सामाजिक बांधिलकी जपत प्रभाग क्रमांक १५ मधील इच्छुक उमेदवार हर्षदा अमोल थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. प्रवीण बढे यांच्या मार्गदर्शनाखाली जर्मन टेक्नालाॅजी मशिनच्या साह्याने विविध वैद्यकीय तपासण्या व सल्ला सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

निगडी प्राधिकरणात पेठ क्रमांक २७ येथील संत तुकाराम उद्यानाजवळील स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक संस्था येथे शनिवारी (दि. २० डिसेंबर) सकाळी १० ते दुपारी दोन वाजता दरम्यान शिबिर होणार आहे. शिबिरात साधारणतः आठ हजार रुपयांपेक्षा अधिकच्या आरोग्य तपासण्या पूर्णतः मोफत करण्यात येणार आहेत. यामध्ये हाडांची घनता तपासणी (बीएमडी), उंची-वजन- बीएमआय मोजमाप, बॉडी फॅट तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी (रँडम) तसेच डॉक्टरांचा मोफत सल्ला यांचा समावेश आहे. याशिवाय नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत रक्ततपासणी, मोफत नेत्रतपासणी, मोफत दंतचिकित्सा करण्यात येणार आहे.

रक्तदात्यांचा विशेष सन्मान
श्री.अमोल थोरात मित्र परिवार व स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तरुणांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदानासाठी पुढे यावे, तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





















Join Our Whatsapp Group